अंबरनाथ शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने गाठले त्रिशतक


अंबरनाथ :- शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अंबरनाथ शहरातील रुग्ण संख्येने त्रिशतक गाठले आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत आज 17 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 304 इतकी झाली आहे. रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने शहरातील दुकाने  पुढील आदेश हाई पावेतो सकाळी ७.०० ते     दु. १२.०० वाजेपर्यंत  असा बदल करण्यात येत आहे. 


अंबरनाथ नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १२१ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत तर १७६ रुग्णांवर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरपरिषदेने 1189 जणांचे स्वॅप नमुने आतापर्यंत तपासले आहेत त्यापैकी 765 निगेटिव्ह आलेले आहेत तर 304 पॉझिटिव आलेले आहेत. सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. पालिकेत आज एकूण 36 जणांचे कोरोनाव्हायरस झाले त्यापैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह तर 19 अहवाल आलेले आहेत.105 जणांचे अहवाल  प्रतीक्षेत आहेत.510 जणांना स्वतःच्या घरात अलगीकरण करण्यात आले आहे.


अंबरनाथ शहरातील नागरिक जास्त प्रमाणात घराबाहेर  पडत असल्याने व शासनाचे नियमांचे पालन करीत नसल्याने रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण अधिक झाल्याचे निदर्शनास  आल्याने मुख्याधिकारी यांनी दिनांक ०४/०६/२०२० रोजीच्या आदेशातील दुकाने / आस्थापना यांचे वेळेत बदल करून पुढील आदेश हाई पावेतो सकाळी ७.०० ते दु. १२.०० वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


 


 


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...