आज बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरात प्रत्येकी एकोणवीस जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आलेला आहे त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 292 तर अंबरनाथ शहरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या 323 इतकी झाली आहे.
बदलापूर शहरातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 131 तर अंबरनाथ मधील 192 इतकी आहे. आतापर्यंत अंबरनाथ शहरातील 125 बदलापूर शहरातील 152 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आहे. कोरोनामुळे बदलापूर शहरात आतापर्यंत 9 जणांचा तर अंबरनाथ मधील ०७ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अंबरनाथ शहरातील 133 जणांचा कोरोना अहवाल येणे बाकी आहे तर बदलापूर मधील 22 जणांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. बदलापूर मधील 602 व्यक्तींचे तर अंबरनाथ नगरपालिकेने 1292 जणांचे स्वॅब कलेशन केलेले आहेत.