बदलापूर : हिवाळ्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण करू नये, याकरिता नगरपालिका प्रशासन सरसावले असून . जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क अधिक असणाऱ्या व्यक्तींमुळे संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत त्यामुळे , अशा घटकांकडे अधिक लक्ष देण्याचे धोरण नगरपालिका प्रशासनाने स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून नगरपालिका क्षेत्रातील ज्या व्यक्तींना कोरोना संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे, तसेच ज्या लोकांच्या संपर्कात दररोज जास्त लोक येतात म्हणजेच भाजीवाले, फेरीवाले, केशकर्तनकार, रिक्षाचालक, दुकानदार, हातगाडीवाले, अशा ‘सुपर स्प्रेडर्स' नागरिकांचा शोध घेऊन त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन RT PCR चाचणी करण्यात येत आहे.
कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी नगरपरिषदेमार्फत् प्रयत्न करण्यात येत आहेत. काही महिन्यांपूर्वी दरदिवशी 80 ते 90 अशी रुग्णसंख्या होती ती आता 20 ते 30 पर्यंत कमी झाली आहे. व्यापक प्रमाणात नागरिकांच्या काव्हिड१९ RT PCR टेस्ट करुन संसर्ग पसरवणारे लक्षण विरहित कोव्हिड १९ रुग्ण शोधून काढणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने मुख्याधिकारी यांनी कुबनप अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने या संदर्भात उपक्रम राबवायला सुरुवात केली असून कोव्हिड१९ च्या रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. तसेच यानंतर शहरातील सर्व सरकारी कार्यालयातील आस्थापनात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सदर कोव्हिड१९ टेस्ट RT PCR करण्यात येत आहे. अशा प्रकारे कुळगांव बदलापूर शहर कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी दमदार पावले टाकत रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यावर भर दिला आहे. याबाबत नगरपरिषदेत दैनंदिन आढावा घेतला जात असून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. कोव्हिड१९ आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व सुचना जनतेस करण्यात येत आहेत. शहरातील सर्व नागरिकांनी या सुचनांचे पालन करावे व शहर कोरोनामुक्त करण्याकरिता नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
व्यापक प्रमाणात नागरिकांच्या कोव्हिड१९ RT PCR टेस्ट करुन संसर्ग पसरवणारे लक्षण विरहित कोव्हिड १९ रुग्ण शोधून काढणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी कुबनप अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने या संदर्भात उपक्रम राबवायला सुरुवात केली असून कोव्हिड१९ च्या रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.अशी माहिती पालिका प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.