नवी दिल्लीः UIDAI ने आधारसंबंधी मोठा दिलासा दिला आहे. . आपलं नाव, पत्ता आणि जन्मतारीख आणि जेंडर अपडेट करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. . UIDAI पत्त्याशिवाय सर्व डेमोग्राफिक डिटेल्सला अपडेट करण्याची सुविधा बंद केली होती. परंत पुन्हा एकदा UIDAI ती सुविधा सुरू केली आहे .
UIDAI ने केले ट्विट
UIDAI ने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिलीय. आता घरबसल्या आपण UIDAI च्या वेबसाइटवर नाव, पत्ता, जन्मतारीख आणि जेंडर अपडेट करू शकता. पण आता ही सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.
अशा प्रकारे करा आपले आधार update
>> पहिल्यांदा आपल्याला ऑफिशियल वेबसाइटवर जावे लागेल
>> इथे आपल्याला माय आधार सेक्शनमध्ये जाऊन ‘अपडेट युवर आधार’ वर क्लिक करा
>> त्यानंतर ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन’ वर क्लिक करावे लागेल
>> नवीन पेज ओपन केलं जाईल.
>> त्याशिवाय आपण डायरेक्ट https://ssup.uidai.gov.in/ssup/ विझिट करू शकता.
>> इथे आपल्याला ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ वर क्लिक करावे लागेल
>> नव्या ओपन झालेल्या पेजवर 12 डिजिटचा आधार नंबर नोंदवा
>> कॅप्चा कोड टाकल्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा
>> रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येणाऱ्या ओटीपीला निर्धारित स्पेस टाकून सबमिट करा.
>> नव्या उघडलेल्या पेजवर आपल्याला दोन पर्याय मिळतील
1. सपोर्टिंग डॉक्युमेंट प्रूफबरोबर एड्रेससह डेमोग्राफिक डिटेल्सचं अपडेशन
2. एड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे एड्रेस अपडेट करा
>> नाव, जन्मतारीख, लिंग, पत्त्यासारखे कोणतेही डॉक्युमेंट्स प्रूफसह अपडेट करण्यासाठी अपडेट डेमोग्राफिक्स डेटावर क्लिक करा.
>> त्यानंतर आपल्याला जी माहिती अपडेट करायची आहे, ती निवडा. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
रजिस्टर्ड मोबाइल नंबर हवा
ऑनलाइन अपडेशनच्या वेळी नोंदणीकृत मोबाईल नंबर द्यावा लागेल. कारण आपल्याला सर्व ओटीपी त्याच नंबरवरून प्राप्त होणार आहेत.
