राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया बुधवार २३ डिसेंबर २०२० म्हणजेच आज पासून सुरु झाली. आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणार असलेले अशा सर्व प्रकारचे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने ही नोंदणी करू शकणार आहेत.
नोंदणी कुठे करायची?
राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in यावर विद्यार्थी माध्यमिक शाळांमार्फत नोंदणी करू शकतात.
नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत
- २३ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत
- १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
माध्यमिक शाळांनी चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत
- २३ डिसेंबर २०२० ते १ फेब्रुवारी २०२१
माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रि-लिस्ट जमा करण्याची मुदत
- ४ फेब्रुवारी २०२१
या तारखांव्यतिरिक्त बोर्डाने परिपत्रकात आणखी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. त्यासाठी Saral Data वरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तसेच यावर्षी नव्याने फॉर्म १७ द्वारे नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेसाठी अ्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही बोर्डाने कळवले आहे.