क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 190 वी जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 190 वी जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी
बदलापूर :- राज्य शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आज बदलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे विविध प्रभागात महिला शिक्षण दिवस म्हणून मोठया  उत्साहात साजरा करण्यात आला. 
सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले  आणि महात्मा जोतीराव फुले  यांनी  १८व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी कार्य केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.त्यामुळे सावित्रीबाई फुले यांची जयंती यंदाच्या वर्षांपासून महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रभागात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत महिला शिक्षण साजरा करण्यात आला.
त्यानुसार प्रभाग क्र ९ व १० भागात
आजच्या या महिला शिक्षण दिनी सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसने महिलांना मार्गदर्शन करण्यात आले  तसेच  कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रियांका दामले,  अनघा वारंग, नगरसेविका वंदना साळवे, हर्षाली गायकवाड, कांबळे ताई, देवघरे काकू, मंगला डोळस, साळवी काकू, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
तसेच वॉर्ड नं.४६ मधील सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मंडळाच्या महिला सदस्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे आयोजन अनिल मराडे यांनी केले होते. यावेळी राम लिये, सुदाम घुगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बदलापूर शहराचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.  स्वातंत्र्य आणि समानता मिळवून देणाऱ्या संविधानाच्या प्रती आणि भेटवस्तू वाटत साजरा करण्यात आला.



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...