राज्य सरकार कर्मचाऱयांसाठी नवे वर्ष शिस्तीचे

राज्य सरकार कर्मचाऱयांसाठी नवे वर्ष शिस्तीचे

नवीन वर्षात सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांना वेळेची शिस्त लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऑफीसला उशिरा आल्यास संध्याकाळी एक तास उशिरापर्यंत काम करावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी व कर्मचाऱयांसाठी ऑफीसमधल्या उपस्थितीबाबत नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
एक महिन्यात तीनपेक्षा अधिक वेळा ऑफीसला विलंबाने आल्यास अर्ध्या दिवसाची कॅज्युअल लिव्ह(सीएल) कापली जात होती. पण आता एक पूर्ण सीएल कापली जाणार आहे.
कर्मचाऱयाला एका वर्षात आठ सीएल मिळतात. पण सीएल संपल्या असतील तर अर्नलिव्ह (अर्जित रजा) कापली जाईल. या रजाही शिल्लक नसतील तर त्या कर्मचाऱयाची विना वेतन रजा होईल.
अर्जित रजा शिल्लक नसल्यास असाधारण रजा (विनावेतन) मंजुर करण्यात यावी. ही  सवलत महिन्यातील केवळ पहिल्या नऊ उशीरा उपस्थितीसाठी देण्यात आली आहे. त्यापुढील उशीरासाठी असाधारण म्हणजेच  विनावेतन रजा म्हणून मंजूर करण्यात येणार आहे. तसेच परिवर्तित रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात येत असल्याने कोणल्याही परिस्थितीत उशीरा उपस्थितीसाठी ही रजा मंजूर करण्यात येणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

 दिनांक २४ फेब्रुवारी, २०२० च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांकरिता शासकीय कार्यालयांची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ व  गट-अ ते गट-क च्या अधिकारी / कर्मचान्यांच्या बाबतीत कार्यालयीन उशीरा उपस्थिती ही सकाळी ९.४५ पासून दीड तास म्हणजेच सकाळी ११.१५ आणि शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेळ ही सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी निश्चित करण्यात आली आहे. अशा वेळी उशीरा उपस्थिती ही सकाळी ११.०० वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे.
 रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे किंवा कर्मचान्यांच्या नियंत्रणाबाहेरील आकस्मिक घटनेमुळे जे कर्मचारी उशीरा येतील, त्यांची उशीरा उपस्थिती न मांडता ती क्षमापित  करण्याचे अधिकार संबंधित विभागांना देण्यात आले आहेत तथापि असे करताना, संबंधित विभागांनी यासंदर्भात खातरजमा करावी.असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी प्रत्येक सहामाहीच्या अखेरीस अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत आढावा घेऊन वरीलप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच प्रत्येक विभाग / कार्यालयाने त्यांचेशी संबंधित सहामाही अहवाल अनुक्रमे १० जुलै तसेच १० जानेवारी पर्यंत सोबतच्या विवरणपत्रात संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे पाठवावा.असेही आदेश देण्यात आले आहेत.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...