बदलापूर :- महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग मार्फत राज्यामध्ये पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासाठी " माझी वसुंधरा " हे अभियान राबविण्यात येत आहे. " माझी वसुंधरा " अभियानाच्या अनुषंगाने कुळगांव बदलापूर नगरपरिषदेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. " जल" या पंचतत्वांच्या संरक्षण आणि संवर्धन या अंतर्गत कुळगांव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील उल्हास नदी चौपाटी, बदलापूर गांव रोड, उल्हास नदी येथे नदी सफाई मोहीम राबविण्यात येत आहे.
कुळगांव बदलापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, जेष्ठ नागरिक संघ, शासकीय निमशासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी" विना वाहन प्रवास दिवस " पाळून सायकलद्वारे किंवा सार्वजनिक वाहतुकीद्वारे उल्हास नदी येथे पोहचून उल्हास नदी सफाई मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. दिपक पुजारी यांनी केले आहे.