ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा धुव्वा, आमदार खासदार भाजपचे असतानाही भाजपचा लाजीरवाणा पराभव

बदलापूर :- ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून सत्तावीस ग्रामपंचायती करिता संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा पुरता धुव्वा उडालेला दिसून येत आहे. मुरबाड विधानसभा मतदार संघात आमदार आणि खासदार भारतीय जनता पक्षाचे असतांना देखील ग्रामीण भागात भाजपला अपेक्षित यश मिळालेले दिसून येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार २७ पैकी केवळ ०७ ग्रामपंचायतींमध्ये भाजपची सरशी झाल्याचे चित्र आहे.
अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत करिता 15 जानेवारी रोजी मतदान संपन्न झाले आणि आज 18 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली.
अंबरनाथ तालुक्यातील मुरबाड  विधानसभा मतदार संघात समाविष्ट होणाऱ्या ग्रामपंचायती पैकी केवळ ३ ग्रामपंचायत भाजपकडे तर तब्बल १२ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना तर एका ठिकाणी महाविकास आघाडी ची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. तर अंबरनाथ तालुक्यात मोडणाऱ्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादी 04, भाजप 04, महाविकास आघाडी 02, मनसे 01

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...