ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१अंबरनाथ तालुक्‍यात ८२.८४ टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१
अंबरनाथ तालुक्‍यात ८२.८४ टक्के मतदान
अंबरनाथ :- तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी आज मतदान संपन्न झाले. अंबरनाथ तालुक्यात ८२.८४ टक्के मतदान झाले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील 27 पैकी गोरेगाव ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. विविध ग्रामपंचायतीतील 68 उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे. अंबरनाथमधल्या 26 ग्रामपंचायतीमध्ये 173 जागांवर निवडणूक झाली, याकरिता  247 उमेदवार रिंगणात आहेत. 78 मतदान केंद्रावर आज मतदान संपन्न झाले. आज सकाळपासूनच  ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदारांनी कोरोनाचे नियमांचे पालन केल्याचे दिसून आलं. या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...