कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम इच्छुकांनी केला हायजॅक ?


कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम इच्छुकांनी केला हायजॅक ?
बदलापूर :-  "ये हम है और ये हमारे, मतदार, हम इन्हे लाये है,  कोरोना वॅक्सिनेशन  के लिए ! अशाच काही थाटात  बदलापूर शहरातील काही राजकारणी कोरोना लसीकरणाचा वापर आगामी नगरपालिका निवडणूक  प्रचाराकरिता करतांना  दिसत आहेत. .त्यामुळे अशाच काही फोटोंनी सोशल मीडिया भरलेले दिसत आहे. केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येत असलेले कोरोना लसीकरण मोहीम बदलापूर शहरात मात्र स्थानिक इच्छुकांनी हायजॅक केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 
पहिल्या टप्प्यात प्राधान्याने कोविड योद्ध्यांसाठी लसीकरण मोहिम राबवल्यानंतर आता १ मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झालेला आहे. या टप्प्यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या व्यक्तींना कोविडची लस देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमे नुसार बदलापूर नगरपालिकेच्या दुबे रूग्णालयात कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे हीलस मोफत स्वरूपात असून दररोज 100 लोकांना लसीकरण करण्यात येत आहे. याकरिता ऑनलाइन पद्धतीने तसेच टोकण पद्धतीने नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
टोकण पद्धती नुसार सकाळी ८ वा. टोकन  देण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यानुसार दररोज १०० जणांना टोकण दिले जातात. त्याकरिता शहरातील या राजकारण्यांनी आपल्या काही कार्यकत्यांची नेमणूक केली आहे, कि जे आपल्या कार्यालयात लाभार्थी नोंदणी करून, टोकण घेण्यापासून लसीकरण नंबर पर्यंत काम करतात. लसीकरण झाल्यानंतर लाभार्थींसोबत फोटो सेशनचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर अमुक अमुक समाजसेवक च्या सहकार्याने लसीकरण संपन्न अशी पोस्ट वायरल केली जाते . 

कोरोनाविषाणू च्या लढ्यात लाखो नव्हे तर करोडो दृश्य अदृश्य हात आपापल्या पद्धतीने कर्तव्य बजावत आहेत, कोणत्याही प्रसिद्धीची त्यांना गरज नाही. परंतु कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आहे या कार्यक्रमास हातभार लाभावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि तीळ असणे सहाजिकच आहे परंतु राष्ट्रीय कार्य करत असताना अशा प्रकारची प्रसिद्धी मिळविण्याची काय गरज असा प्रश्न सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांना नक्कीच पडत असेल. तसेच केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने लसीकरण नोंदणी करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत अशावेळी राजकारण्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत होणारी लुडबुड निश्चितच भूषणावह नाही. यासोबतच लसीकरणाचे काम करणाऱ्या यंत्रानेस आपला त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...