बदलापूरः नाशिकच्या बागांमधील ताजी, निर्यातीच्या दर्जाची द्राक्षे आता अंबरनाथ आणि बदलापूरमधील ग्राहकांना थेट उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाचा कृषीविभाग, शेतीजन्य संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किफातशीर दरात शनिवार २० आणि २१ मार्च सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील विविध केंद्रांवर ही द्राक्ष उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अंबरनाथ शहरात पूर्वेतील खेर विभागात गोखले रहाळकर शाळा येथे पुरूषोत्तम उगले यांच्या कार्यालयाबााहेर शनिवार २० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता, वडवली विभागातील बाजीप्रभू पथ येथे सर्जेराव माहुरकर संपर्क कार्यालय, नवरे नगर बी केबीन रोड येथे मिलिंद गान यांचे शिवसेना जनसंपर्क कार्यालय, सुर्योदय सभागृहासमोर पद्मगुंफा इमारत या चार केंद्रांवर ही द्राक्षे पेटीबंद पद्धतीने उपलब्ध होतील. तर बदलापूर शहरात पश्चिम भागात सुर्वोदय नगर परिसरात हेंद्रेपाडा रस्त्यावर नाल्याच्या शेजारी आणि पूर्व भागात रेल्वे उड्डाणपुलाखाली सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत उपलब्ध असतील. शनिवारी सकाळी बदलापूर येथील सुर्वोदय नगर येथील केंद्रावर जिह्याचे कृषी अधिक्षक अंकुश माने, आमदार किसन कथोरे, मुख्याधिकारी दीपक पुजारी आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या उपस्थितीत या विक्री केंद्रांना सुरूवात होईल. अधिक माहितीसाठी संपर्क - 8766990081.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
उरुऴी कांचन दि.२२ :- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्हयातील उरुळी कांचन य...
-
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. नगरपालिकेने जाहीर केले...
-
'माझी वसुंधरा' अभियान अंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांकरिता उद्या 'ना वाहन दिवस' (No vechile's Day) बदलापूर :- राज्यातील पर्य...
-
* ठाणे, दि.२० (जिमाका): आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर...
-
बदलापूर :- येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात...