शहापूरात शिवसेनेला खिंडार, नगरसेवकासह शिवसैनिक भाजपात



खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत अजित आळशी भाजपमध्ये

भिवंडी : शहापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सात प्रभागामधील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्ते व एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला शहापुरात मोठे खिंडार पडले आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे नगरसेवक अजित आळशी यांच्यासह कार्यकर्ते भाजपात दाखल झाले.
शहापूरातील प्रभाग क्रमांक ४, ७, ८, ११, १२, १३, १५ या सात प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक अजित आळशी, अस्मिता अजित आळशी, प्रतीक्षा प्रदीप आळशी, मयूर  भोपतराव, मिताली भोपतराव, योगेश महाजन, गीता महाजन, जगदीश गवाले, मकरंद चव्हाण, युवा सेनेचे शहापूर शहराध्यक्ष प्रियेश जगे, समीर रमेश अवसरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गणेश धसाडे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते भाजपचा झेंडा घेऊन पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतले. शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शहापूर शहरात भाजपची ताकद वाढली असून शिवसेनेसमोर मोठे आव्हान तयार झाले आहे.
या वेळी भाजपचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, नगरसेविका वैदेही नार्वेकर, सतीश गुजराथी, ज्येष्ठ नेते अशोक इरणक, जिल्हा सरचिटणीस सुभाष हरड, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, प्रशांत फुले, विलास जोशी, विकास कुलकर्णी, भास्कर भांगरे, मनोज शहा, कमलाकर घरत, राम जागरे,  विकास कुलकर्णी, प्रताप जगे, निशिगंधा बोंबे, रंजना उघडा, प्रेमकुमार बोटकोंडले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...