बदलापूर- ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांच्या मध्ये जनजागृती व्हावी याकरिता मोहनानंद नगर, पंचरत्न परिसर प्रभाग क्र.७ मध्ये शिवसेनेच्या सुवर्णा सतिष साटपे यांच्या वतीने फलक लावण्यात आले आहेत.राज्यात आणि देशातील कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असताना राज्याच्या काही भागात पुन्हा लॉगडाऊन होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर्वीच्या लॉगडाऊन मुळे रोजगार/नोकऱ्या गेल्या आहेत यामुळे मागील काही दिवसांपासून सर्वत्र सोनसाखळी चोरी, मोबाईलची चोरी, पर्स ची चोरीचे प्रमाण कुठेही वाढताना दिसून येत आहे. या चेन स्मचिंग ला आला बसावा म्हणून सुवर्णा सतिष साटपे यांनी यावर एक युक्ती म्हणून आपल्या विभागात सोनसाखळी/मोबाईल/पर्स चोरांच्या पासून सावधान राहण्यासाठी जनजागृती फलक आपल्या विभागात लावले आहेत.
एकाद्या महिलेचे जर चेन स्मचिंग झाले तर त्या महिलेकडे मुळात पोलिसांचा नंबर नसतो त्यामुळे ती महिला पोलिसांना फोन करत नाहीत तर ती आधी कुटूंबियांना फोन करते यात खूप वेळ निघून जातो आणि हे चोर मोटारसायकल वरून काही क्षणात फरार होता या फलकावर बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन चा नंबर आहे आणि उल्हासनगर पोलीस कॅट्रोल रूम चा देखील नंबर आहे. अश्या काही घटना जर कुठे घडल्या तर ती महिला त्या फलकावर दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करू शकते आणि पोलीस बिट मार्शल त्या ठिकाणी पोहचून लगेच त्या चोरांच्या मुसक्या आवळू शकतात.
यासोबतच अनोळखी टेली कॉलिंग च्या माध्यमातून आपल्याकडून आधार नंबर पॅन नंबर OTP नंबर बँक खाते क्रमांक ची मागणी गेली केली जाते या संदर्भात महिलांनी विशेष जागृत राहवावे असे आवाहनही या जनजागृती फलकाद्वारे करण्यात आले आहे. सदर फलक तयार करताना बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्ता गावडे साहेब याच्या सूचनेवरून तयार करून बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन मधील महिला कर्मचारी यांच्या हस्ते या फलकांचे उद्घाटन करून असे ३० फलक तयार करून प्रभाग क्र. ७ मध्ये लावण्यात आले आहेत. महिला दिनानिमित्त सुवर्णा साटपे यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे चर्चा संपूर्ण बदलापुरात होत आहे .यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.