शेकडो वर्षांची परंपरा यंदा खंडित; महाशिवरात्रीला प्रथमच भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याची वेळ..

अंबरनाथ:  येथील शिव मंदिर शिवलिंग मध्यरात्री उघडण्यात आले. प्रशासनाने दिलेले आदेश व सुचनेनुसार मोजके पुजारी ,मानकरी व सेवेकरी यांचे हस्ते शिवलिंगाची पूजा -अभिषेक करण्यात आले. शेकडो वर्षांची परंपरा यंदा खंडित होऊन प्रथमच भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याची वेळ आली तसेच जमावबंदी आदेश असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट होते.
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर आणि महाशिवरात्री उत्सवाला विशेष असे महत्व आहे . लाखो शिवभक्त महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथे दर्शनासाठी येत असतात ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा यावेळी या ठिकाणी भरत असते त्यामुळे दरवर्षी भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी होत असते. 
महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवमंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे नगरपालिका व पोलिस प्रशासनाने जाहीर केले होते. यासंबंधित फलकदेखील मंदिर परिसरात लावण्यात आले. मंदिर बंद असल्याने भाविकांनीदर्शनासाठी मंदिरात येऊ नये असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी केले होते. नगर पालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने केलेल्या आव्हानात शिवभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंदिर परिसरात येण्याचे टाळले त्यामुळे शेकडो वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच शिव मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला.
 दरवर्षीप्रमाणे मंदिर या वर्षीही आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. शिवरात्रीच्या आदल्या दिवशी बुधवारी मध्यरात्रीनंतर पुजारी आणि मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंदिरात कोरोनाचे नियम पालन करून धार्मिक विधी करण्यात आले.यावेळी महाशिवरात्री निमित्त शिवमंदिराच्या आवारात शिवमंदिराची रांगोळी काढण्यात आली होती. अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी शिवमंदिराची पाहणी केली. पोलिसांच्या श्वान पथकाने देखील यावेळी परिसराची पाहणी केली.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...