महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्प प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जमाफी ची महत्वपूर्ण घोषणा सरकारने घोषित केली आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने असणाऱ्या या योजनेत पंधरा हजार लाभार्त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ही यादी जाहीर करताना सरकारनं प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश केलेला असून, पहिल्या यादीत ६८ गावातील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अमलबजावणी करण्यापूर्वी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अमलबजावणीचं काम सुरू झालं असून सरकारनं कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. यावर २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री दादाजी भुसे यांनी या बद्दलची माहिती दिली होती. या बद्दलची माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर २७ फेब्रुवारी व २ मार्च ला यावर चर्चा होणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. विरोधकांनी मात्र हि कर्जमुक्ती नाही आणि चिंतामुक्तीही नाही अश्या शब्दात सत्ताधार्यांवर टिका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाच्या अभिभाषणात विरोधनकावर टिक्का करत हे सरकार विरोधकांस बांधील नाही तर ते लोकांशी बांधील आहे अश्या कोपरखाळ्या ही दिल्या आहेत. घोषणा झाली असली तरी त्याची सक्रिय अंमलबजावणी होणं तितकाच महत्वाचं आहे.
महाराष्ट्र राज्य कर्जमाफी झाली जाहीर
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...

-
सुवर्णा साटपे यांचा आगळा वेगळा उपक्रम बदलापूर: भारतीय संस्कृतीमध्ये वटपोर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या सण...
-
अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये एकव...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...
-
RYAN INTERNATIONAL SCHOOL, AMBARNATH NATIONAL DOCTOR'S DAY National Doctors Day was celebrated in Ryan International S...