खाजगी संस्था अथवा व्यक्तीस निर्जंतुकीकरण फवारणी करण्यास पालिकेने केली मनाई

बदलापूर :- कुळगाव - बदलापूर शहरामध्ये कोरोना (कोविड – १९) विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये त्याकरिता उपाययोजना म्हणून काही नागरिकांकडून, खाजगी संस्थांकडून तसेच  नगरसेवकां कडून त्यांचे परिसरामध्ये स्वेच्छेने औषध फवारणी करण्यात येत  आहे. तथापि, शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करणे बेकायदेशीर असून कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी फवारणी करणेस परवानगी नाही.


कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये  औषध फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून औषध फवारणी करण्याची आवश्यकता नाही.असे आदेश मुख्यधिकारी यांनी दिले आहेत. 


तरी त्याअनुषंगाने नगरपालिका मार्फत शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी प्राधान्याने औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच  सबब कोणत्याही नागरिक, खाजगी संस्था अथवा सन्माननीय सदस्यांनी सार्वजनिक परिसरामध्ये औषध फवारणीची कार्यवाही करु नये, असे आवाहन पालिका मुख्यधिकारी प्रकाश बोरसे   यांनी केले आहे.



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...