#Sanjay_Speaks
दिवस ५१ वा
#शिक्षकाने_घेतली_स्वॅब_सॅम्पल_घेण्याची_जबाबदारी
#CoronaWarriors भाग ३)
सर्दी-खोकला-ताप अशी लक्षणं दिसू लागली की आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) तर झाला नाही ना? अशी भीती प्रत्येकाच्या मनात येते. मात्र कोरोना टेस्ट (corona test) करायची म्हटली की एखादा आरोग्य कर्मचारी घसा आणि नाकातील स्वॅब सॅम्पल घेतो. मात्र यामुळे अनेकदा आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक आरोग्य कर्मचारी स्वॅब सॅम्पल घेण्याचे काम करण्यास कचरत असतात. आज आपण अशाच एका स्वॅब सॅम्पल घेणाऱ्या कोरोना वॉरियर्स बद्दल बोलणार आहोत.
माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. संतोष दुबे हे कुळगाव बदलापूर नगरपालिके मार्फत स्थापन करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षात स्वॅब सॅम्पल घेण्याचे काम करीत आहेत. मार्च महिन्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले. कोरोना विषाणूच्या युद्धात डॉक्टर परिचारिका पोलीस असे अनेक कोरोना वॉरियर्स सहभागी झाले. शाळेत ज्ञानर्जनाचे काम करत असताना आपल्या देशाप्रती समाजाप्रती आदर भाव व्यक्त करताना आपणही या कार्यात भाग घ्यावा या उद्देशाने संतोष दुबे हेही हिरारीने सहभागी झाले. त्यांचे बीएससी डी एम एल टी पर्यंतचे शिक्षण त्यांना याकामी कामी आले. आणि त्यांनी कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब सॅम्पल घेण्याचे जोखमीचे काम मोठ्या जबाबदारीने स्वीकारले आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिका शहराच्या हद्दीमध्ये आतापर्यंत ६९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच नगरपालिके मार्फत आतापर्यंत २०० पेक्षा जास्त रुग्णांचे स्वॅब सॅम्पल घेण्यात आलेले आहेत. त्यापैकी १५६ जणांचे स्वॅब सॅम्पल निगेटिव्ह आलेले आहेत तर २१ जणांचे स्वॅब सॅम्पल रिपोर्ट सध्या प्रतीक्षेत आहेत.
स्वॅप सॅम्पल कलेक्ट करणे हे काम मोठ्या जोखमीचे असल्याने त्यांना आपल्या कुटुंबापासून वेगळे राहावे लागते. त्यांना बारा वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी आहे परंतु आपण करत असलेले काम जोखमीचे असल्याने ते त्यांच्यापासून वेगळे राहावे लागते. परंतु समाजाप्रती आपले ऋणानुबंध जोपासना करता त्यांनी हा विरह ही मोठ्या आनंदाने स्वीकारला आहे.
शिक्षक देशातील भावी पिढी घडवत असतात. परंतु हेच शिक्षक देशावर कोणतेही संकट आले तर आपली जबाबदारी पार पाडण्यात मागे राहत नाही हेच ह्या गोष्टीवरून दिसून येते.
#ThanksHealthHeroes
#stayhome