बदलापूर शहरात आज आणखी ६ कोरोना बाधित रूग्ण; एकूण रुग्ण ६९
बदलापूर :- शहरात आज आणखी सहा कोरोना बाधित रुग्ण सापडल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. काल शहरात सहा कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. आज पुन्हा सहा कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६ ने वाढून ६९ इतकी झाली आहे.त्यातील बावीस रुग्णांना यापूर्वी घरी पाठवण्यात आले आहे. आत्तापर्यंत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पुढील उपचार सुरू असलेल्या बाधितांची संख्या -45
** बरे होवून डिस्चार्ज झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या -22
आजपर्यंत एकूण मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या -02
आज डिस्चार्ज मिळालेल्या व्यक्ती :00
आज घेतलेले swab sample -23
आज -ve आलेले एकूण रिपोर्ट संख्या -14
प्रतिक्षेत असलेल्या रिपोर्ट ची संख्या -21
आजपर्यंत रिपोर्ट -ve आलेल्यांची संख्या -156
Quartine center मधील नागरिकांची संख्या -60