बदलापूर :-
शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सतत भर पडत आहे. रुग्ण बरे होत असले तरी नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही, त्यामुळे समस्त बदलापूर करांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत बदलापुरात ०६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे,त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. सध्या ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ०२ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.