अंबरनाथ पोलिसांना रोटरीतर्फे   सुरक्षा किटचे वाटप


अंबरनाथ पोलिसांना रोटरीतर्फे   सुरक्षा किटचे वाटप
कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही आपले पोलीस अत्यंत उत्तम रितीने कार्य करत आहेत. या संसर्गाचा मुकाबला करताना त्यांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, याकरिता रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी तर्फे अंबरनाथ पोलिसांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
अंबरनाथ पोलीस स्टेशन येथील पोलिसांना १५० जणांना हे सुरक्षा किट देण्यात आले. अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी प्रातिनिधिक स्वरूपात हे किट स्वीकारले. Hand sanitizer,  Hand Gloves, Three layer Face mask.



राज्यातील पोलीस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन १६-१६ तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. ही बाब महत्वपुर्ण  आहे. आपण वापरत असलेल्या नेहमीच्या मास्क व्यतिरिक्त या संचातील साधनांचा उपयोग केल्यास  त्याचा फायदा पोलिसांना आरोग्य सुरक्षा दृष्टिने नक्कीच होईल असे यावेळी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीचे अध्यक्ष विशाल ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.
कोरोना विषाणू विरुद्धच्या या लढ्यात पोलीस बांधव आपले सर्व सुख दुःख विसरून आपले कर्तव्य बजावत आहेत.सुरक्षा किट चे वाटप करताना शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील पोलीस अभिजित राजपूत यांचा वादादिवस असल्याचे लक्षात आले त्यामुळे उपस्थित सर्व पोलिसांना चॉकलेटचे वाटप करून राजपूत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...