कोरोनाच्या संकटातही कृषी विभाग शेतकऱ्यांसोबत...
सध्या कोरोनाचे संकट लक्षात घेऊन देशभर लॉक डाऊन जाहीर केले आहे अशा परिस्थितीतही बळीराजा आपले काम न थांबता रात्रंदिवस करीत आहेत. बळीराजाच्या अथक प्रयत्न आणि परिश्रमामुळे लॉक डाऊन असूनही आपल्या सर्वांना वेळेवर भाजीपाला फळे अन्नधान्य उपलब्ध होत आहे.
बळीराजाच्या प्रयत्नांना आणि परिश्रमांना साथ मिळत आहे ती महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाची, कृषी विभागाचे सर्वच कर्मचारी 100% उपस्थिती देऊन कोरोना संकटात बळीराजाला भक्कम साथ देत आहेत. तालुका कृषी अधिकारी सुवर्णा माळी यांच्यासह अंबरनाथ तालुक्यातील कृषी विभागातील सर्वच कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत.