केवळ आठ दिवसात अंबरनाथ शहरातील रुग्णसंख्या झाली दुप्पट


अंबरनाथ :- 25 एप्रिल रोजी अंबरनाथ नगरपरिषदेने पत्रकार परिषद घेत अंबरनाथ शहर कोरोना मुक्त झाल्याचे जाहीर केले. ही घोषणा उलटून 24 तासही होत नाही तोच अंबरनाथ मध्ये कोरोना रुग्ण सापडला होता. आणि आज कोरोना मुक्ती घोषणेच्या  ४५ दिवसानंतर अंबरनाथ शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 392 इतकी झाली आहे. 


अंबरनाथ शहरात 24 एप्रिल पर्यंत चार कोरोना ग्रस्त रुग्णांची नोंद होती यापैकी एकाचा मृत्यू झाला होता व बाकीचे तीन बरे होऊन घरी गेले होते. अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनाने पत्रकार परिषद घेत अंबरनाथ शहर कोरोना मुक्त झाल्याचे जाहीर केले, मग काय शहरात एकच जल्लोष झाला. शहर कोरोना मुक्त झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर वायरल झाल्या, अभिनंदनाच्या पोस्ट ही मोठ्या प्रमाणात झालेल्या फेसबुक आणि व्हाट्सअप मिरवत होत्या.परंतु शेवटचा रुग्ण सापडल्यानंतर 28 दिवस शहर निरीक्षणाखाली असते त्या दरम्यान रुग्ण आढळला नाही तर शहर कोरोना मुक्त झाले असे जाहीर करण्यात येते परंतु प्रशासनाने आता ताई परत घाईघाईने पत्रकार परिषद घेत अंबरनाथ शहर कोरोना मुक्त झाल्याचे झाल्याची घोषणा केली आणि प्रशासनाची हीच घाई आता   रुग्ण वाढीचे मुख्य कारण ठरत असल्याची चर्चा अंबरनाथ शहरात होत आहे.


एक जून ते आठ जून ह्या आठ दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दुप्पट झाली आहे.एक जून ते आठ जून या कालावधीमध्ये अंबरनाथ शहरांमध्ये नव्याने 226 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. एक जूून रोजी 188 रुग्ण होते तर आठ जून रोजी रुग्णसंख्या 392 इतकी झाली आहे.


दिनांक       रुग्ण संख्या     उपचार सुरू      बरे होऊन घरी गेलेले


०१ june       १८८              ११६                    ६७


 


०२ जून           २०८             १३६                   ६७


 


०३ जून            २१४            १२४                   ८३


 


०४ जून            २८७            १५९                  १२१


 


०५ june            ३०४            १७६                १२१


 


०६ जून               ३२६            १९१                १२५


 


०७ जून               ३५६              २१६                १३३


 


०८ जून               ३९२             २५१                १३३


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...