पुन्हा एकदा १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

बदलापूर :- पुन्हा एकदा सतरा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 326 इतकी  झाली आहे. आज 29 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले त्यापैकी बारा अहवाल निगेटिव तर 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज ज्या सतरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यापैकी 4. जण  नायर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना बाधित झाले आहेत तर 10 व्यक्तींना बाधित व्यक्तीच्या  संपर्कात आल्याने कोरोना ची लागण झालेली आहे. उर्वरित तीन पैकी दोघांना कुठल्याही अन्य शहरात प्रवासाचा इतिहास नसताना लागण झालेली आहे तर एक जण बँक कर्मचारी आहे.


कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनामार्फत प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार  नगरपालिका क्षेत्रामध्ये आज पर्यंत कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 326 असून आतापर्यंत 161 बरे होऊन घरी गेलेले आहेत तर 156 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 09 आहे. आज 21 जणांचे स्वाब सॅम्पल घेण्यात आलेल्या आहेत तर आतापर्यंत 42 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. पालिकेने आतापर्यंत 644 व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल तपासली आहेत. 



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...