बदलापूर :- शासनाने मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने (Salon) सुरु करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलून व्यावसायिकांकडून सलून सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर सरकारने अटी आणि शर्तीच्या आधारे सलून सुरू करण्यास परवानगी दिली त्यानुसार झाले.
सलून कर्मचारी आणि ग्राहकांनी मास्क घालणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ग्राहकांच्या आणि चालकांच्या सुरक्षेची काळजी घेत सलून सुरू झाले आहेत.
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर शहरातील सलून व्यावसायिकांनी साफसफाईची कामे करून आजपासून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली सुरू केल्याचे पाहायला मिळाले.
राज्य शासनाने निर्देशित केलेल्या आदेशांच्या अटी शर्तीनुसार आज पासून आपला व्यवसायास सुरुवात केली आहे, अशी माहिती श्री जी जेंट्स पार्लर चे संचालक आनंद जाधव यांनी दिली तसेच कोणत्याही प्रकारची दरवाढ न करता जुन्या दराने केशकर्तन करत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ग्राहकांच्या सुरक्षेचे काळजी घेतो तसेच सुरक्षित अंतर राखून केशकर्तन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .
राज्यशासनाने आजपासून सलून व्यवसाय घरी परवानगी दिल्ली असले तरीसुद्धा शहरातील बहुसंख्य सलून दुकाने बंद असल्याचे दिसून आले.