'माझी वसुंधरा' अभियान अंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांकरिता उद्या 'ना वाहन दिवस' (No vechile's Day)
बदलापूर :- राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, याकामी लोकांचा सहभाग वाढविणे, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 'माझी वसुंधरा' अभियान राबविण्यात येत आहे.
राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकताच अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३९५ शहरे आणि ३३९ मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणारी ३ अमृत शहरे, ३ महापालिका, ३ नगरपंचायती आणि ३ ग्रामपंचायतींना ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.अभियानात राज्यात उत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, ३ जिल्हाधिकारी आणि ३ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयातून अभियानाचा ई-शुभारंभ केला. ३१ मार्चपर्यंत अभियानाचा कालावधी असेल.
त्यानुसार,दिनांक १७/१२/२०२० रोजी कुळगांव बदलापूर शहरात वास्तव्यास राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी ना वाहन दिवस पाळणार आहेत. आपल्या घरापासून कार्यालया पर्यंत चालत किंवा सायकल वरुन कार्यालयात येणार आहे. तसेच सदर दिवशी कोणीही वाहनाचा वापर करणेचा नाही. अशा सक्त सूचना पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत तसेच याबाबत खातेप्रमुख यांनी अंमलबजावणी करुन तसा अहवाल सादर असे आदेश मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आहेत.