शक्ती प्रोसेस या कंपनीत कपड्यावर प्रक्रिया केली जाते. या कंपनीमध्ये कपड्याचा साठा मोठ्या प्रमाणात असून या कपड्याच्या साठ्याला अचानक आज सायंकाळच्या सुमारास आग लागल्याने आग पसरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र,ह्या आगीत कपड्याचा लाखोंचा साठा आणि मशीनरी भस्म झाली आहे.
कंपनीला आग लागताच आतील कामगार तातडीने बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिका आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे आज शुक्रवार असल्याचे ही कंपनी बंद होती. त्यामुळे काही तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, काम सुरू असतानाच अचानक आग लागली. ही भीषण आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. आतापर्यंत या आगीत कुणालाही दुखापत झाली नसल्याचे वृत्त आहे
