कु. ब. न. प. अधिकाऱ्यांनी घेतली पर्यावरणरक्षणाची शपथ
बदलापूर : महाराष्ट्र शासनाने २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत राज्यात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देशित केले आहे.त्यानुसार सदर अभियान कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात 'माझी वसुंधरा अभियान" राबवले जात आहे. या अभियानांतर्गत नववर्षाच्या निमित्ताने पर्यावरणरक्षणाप्रति आपली जबाबदारी म्हणून नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पृथ्वी, जल, अग्नी, वायू आकाश या पंचतत्त्वांचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी हरित शपथ घेतली.
नगर परिषदेच्या प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाचे सर्व नियम पाळून हा शपथविधी सोहळा पार पडलायावेळी मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी अधिकारी व कर्मचारी यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि वातावरणातील प्रतिकूल बदलांना प्रतिबंधित करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान हे शासन अभियान राबविण्यात येत असून नगर परिषदेचे विभाग आणि कर्मचारी समन्वय साधून उपक्रमांची अंमलबजावणी करावी. अभियान कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे मत मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी व्यक्त केले.
यावेळी उपमुख्याधिकारी सुभाष नागप, शहर अभियंता जयेश भैरव,लेखापाल प्रवीण वडगाये, भगवान राठोड, अभियंता कुंभार, जल व सांडपाणी शहर अभियंता सुरेंद्र उईके, सहा. नगररचनाकार सुदर्शन तोडणकर, विद्युत अभियंता राजेंद्र बोरकर, शिक्षण विभागप्रमुख विलास जड़ये आदी उपस्थित होते.