तो पुन्हा आला, आतापर्यंत 7 दिवसात तब्बल 237 रुग्णांना केले बाधित ....


बदलापूर :- पुन्हा येईल म्हणून प्रशासनाच्यावतीने सातत्याने सतर्क करण्यात येत होते शासनाचे वतीनेही सतर्कता बाळगण्याचे आव्हान करण्यात येत होते अशा परिस्थितीमध्ये तो पुन्हा आला आणि त्याने सात दिवसांमध्ये 198 लोकांना बाधित केले आहे. हो, तो पुन्हा आला आहे, तो म्हणजेच कोरोना.....
कुळगाव बदलापूर नगर पालिका प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार कोरोना बाधित रुग्ण संख्येनुसार शनिवार 26, रविवार 32, सोमवार 35, मंगळवार 32, बुधवार 32, गुरुवार 39, शुक्रवार 41 दि.20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत एकूण 237 रुग्ण कोरोना बाधित झालेले आहेत.
कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील आतापर्यंत कोरोना झालेल्या  एकूण रुग्णांची संख्या 9862 इतकी असून आतापर्यंत 9570 म्हणजेच 97.03% रुग्णांवर यशस्वी उपचार खाऊन घरी गेलेले आहेत तर 165 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Covid- १९ चा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या कोविड १९ ला आळा घालण्याच्या प्रयत्नांना सहकार्य करून सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच मास्कचा वापर करावा असे आव्हान नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात विना मास्क आढळ्यास दंड : ३०० रु , दुसर्यांदा विना मास्क आढळ्यास ५०० रु, लग्नसमारंभ , सार्वजनिक कार्यक्रम , जिम , हॉटेल येथे नियमाचे पालन न केल्यास व ५० पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी आढळल्यास दंड : ५००० रु भरावा लागेल असे ताकीद नगरपालिका मुख्याधिकारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आतापर्यंत कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने २१५ विना मास्क व्यक्तीवर कार्यवाही केली आणि ६४५०० रुपये दंड वसूल केला आहे. Covid- १९ चे कुठलेही लक्षण आढळ्यास किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संर्पकात आल्यास 
खालील ठिकाणी जाऊन covid -१९ ची चाचणी करुन घ्यावी : मराठी शाळा गांधी चौक ,बदलापूर पूर्व

आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचणी : १९०६६

covid -१९ वॉर रूम संपर्क ७८८७८९६८५५, 

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेतर्फे containment zone मध्ये निर्जतुकीकरण तसेच covid १९ ला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात contact tracing करण्यात येत आहे .तरी सर्व नागरिकांनी नियमाचे पालन करून सहकार्य करावे. असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...