नगरपालिका निवडणूक आणखी लांबणीवर ......?

बदलापूर :- सर्वच राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार नगरपालिका निवडणुकीत करिता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना आज संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नगरपालिका नियुक्त प्रशासकांना नियुक्तीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे नगरपालिका निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव असल्याने मुदत संपलेल्या व निवडणूक न झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३० एप्रिल २०२१ पर्यंत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्त काळात निवडणूका घेणे शक्य होणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती आयोगाने केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारीत तरतूद समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.तसेच अधिनियमातील प्रस्तावित सुधारणेसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ मध्ये विधेयक सादर करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुदत मे 2020 रोजी संपुष्टात आली असून कोरोना संकटामुळे नगरपालिका निवडणूक अद्यापपर्यंत संपन्न झालेली नाही. नगरपालिका प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण यापूर्वीच जाहीर झालेले असल्याने अनेक इच्छुकांनी आपापले प्रभात वाटून घेतले असून प्रभागात खर्च करण्यास सुरुवात केली आहे विविध कामांच्या माध्यमातून मतदारांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याचे काम इच्छुकांकडून सुरू आहे अशातच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने लवकरच निवडणुका होतील अशी अपेक्षा इच्छुकांना होती तथापि आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयामुळे इच्छुकांचा खर्च तसेच प्रभागातील कामांचा ताण आणखी काही दिवस कायम राहणार आहे असे दिसते.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...