बदलापूर :- मराठी दिनाचे औचित्य साधून मैत्रेय आणि टीम ने "स्वलिखीत" या नावाने मराठी कवितांचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात बदलापूर मधील सर्वांच्या ओळखीचे आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री शामसुंदर जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन मैत्रेय आणि टीम यांना मिळाले. सदर काव्य मैफिल मध्ये विविध विषयांवरील आणि प्रभावी कविता सदर करण्यात आल्या. सदर काव्य मैफिलीत रमेश मोरे, सुरेख गायकवाड, ज्योती गोळे, सौरभ जोशी, माधुरी जोशी, भूषण तांबे, रवी भोसले, अरुण भट, पद्माकर भावे, प्रथमेश गडकर, विजय कांबळे, सानिका कदम, कविता विघे आणि विलोप तांबे या कवींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन मैत्रेय चे खजिनदार जयेश मोरे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात मैत्रेय मधील वैभव पाटील, प्रशांत पाटील, किरण गीध, जयेश यादव यांनी मोलाची कामगिरी बजावली आणि कार्यक्रम यशस्वी पणे पार पडला. तसेच या काव्यसंमेलनास साहित्य क्षेत्रातील श्री कृष्णाजी कुलकर्णी, श्री रवींद्र गुर्जर, श्री किरण येले या दिग्गज व्यक्तींनी आवर्जून उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. या काव्य सोहळ्यात बदलापूर मधील शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री उल्हास आंबवणे आणि शिवसेनेच्या नगरसेविका सौ. उज्वला आंबवणे तसेच बदलापूर मधील ज्येष्ठ साहित्यिक श्री. शामसुंदर जोशी यांचा; त्यांनी "स्वलिखीत" या कार्यक्रमासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
" मैत्रेय ने असेच कार्यक्रम करावे आणि बदलापूर मधील रसिकांचे मनोरंजन करावे त्याला माझा पूर्ण पाठिंबा राहील " असे उल्हास आंबवणे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात उद्गार काढले अखेर सर्व रसिकांचे, मान्यवरांचे अभिवादन करून या काव्य मैफिलीची सांगता करण्यात आली.बदलापूर पूर्व येथे स्टेशन नजिक विभाग प्रमुख उल्हास आंबवणे व नगरसेविका उज्वला आंबवणे यांच्या प्रयत्नातून नुकत्याच तयार करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्टा या छोटेखानी सभागृहात हा काव्य सोहळा पार पडला.