बदलापूर: यंदाची मकरसंक्रांत ही कोरोना काळात आल्यामुळे सर्वत्र महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते पण या वर्षीची परिस्थिती थोडी वेगळी आहे कोरोना ने सर्वत्र भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे मागील काही दिवसाच्या पासून बदलापुरात कोरोनाचे पेंशट वाढताना दिसून येत आहे त्यामुळे यावर आपला मकरसंक्रांतिचा सणही साजरा करायचा आहे म्हणून शिवसेना प्रभाग क्र.७ च्या गट प्रमुख सौ सुवर्णा सतिष साटपे यांनी आपल्या प्रभागात घरोघरी जाऊन हळदी-कुंकू समारंभ चे आयोजन केले होते ते वेळी महिलांना वाण म्हणून आपले घर स्वच्छ तर प्रभाग स्वच्छ या संकल्पनेतून डसबिन देण्यात आले त्याच बरोबर अद्वितीय फार्मा कंपनीचे आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले 100 ml ची सॅनिटाईझर ची बाटली आणि मास्क व तिळगुळ देण्यात आले
कोरोनाला पासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाना वाचवायचे असेल तर नियमितपणे हात धुवा, मास्क वापर, सामाजिक अंतर ठेवा हा संदेश या हळदी-कुंकू समारंभाच्या माध्यमातून देण्यात आला आहे
प्रभाग क्र.७ च्या प्रत्येक घरी या गोष्टी चे वाटप स्वतः सुवर्णा साटपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे
राज्यात कोरोना काहीप्रमाणात वाढत असताना राज्य सरकार ने काही कडक धोरण राबविणार असे जाहीर केले असताना त्यावरी उपाय योजना म्हणून प्रभागात या गरजेच्या वस्तूचे मास्क, सॅनिटाईझर च्या वाटपामुळे नागरिकांच्या मध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आपण आपली व आपल्या कुटूंबियांची काळजी घेऊ असा विश्वास लोकांनी या वेळी व्यक्त केला. कोरोना काळात सौ सुवर्णा साटपे यांनी आपल्या प्रभागात नियमितपणे सॅनिटाईझर फवारणी, धूर फवारणी, आर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्यांचे दोन वेळा वाटप असे अनेक उपक्रम राबवून कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्य उपयोगी उपक्रम राबिवले होते