बदलापूर:- येथील शिवभक्त सुजित मंडलिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बदलापूर पश्चिम मध्ये नागरीकांना सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत मोफत रिक्षा प्रवास सुविधा देऊन नागरीकांना एक अनोखी भेट दिली.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बदलापूरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी शिवभक्त सुजित मंडलिक यांनी आज आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली. बदलापूर पश्चिम मधील बहुतांश नागरीक रिक्षा ने प्रवास करतात, वडवली, बेलवली या भागात राहणारे नागरिकांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. बेलवली रिक्षा स्टँडवर आपल्या रिक्षांवर भगवा ध्वज आणि विनामुल्य रिक्षा सेवेचा स्टिकर लावण्यात आले होते. कोरोना संसर्ग काळात सुरक्षित अंतर, मास्क वापर,आणि स्वयंम शिस्त पाळूया- गर्दी टाळूया असा संदेश देत जयंती साजरी केली.