बदलापूरात शिवजयंती मोठ्या त्साहात साजरी

बदलापूरात शिवजयंती  मोठ्या त्साहात साजरी
बदलापूर: छत्रपती शिवाजी महाराज  जयंती उत्सव बदलापूरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नगर परिषद कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यायाशिवाय शहराच्या भागाभागात राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीनेही छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
बदलापूर पूर्वेला म्हाडा कॉलनी परिसरात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवजयंती निमित्त आंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अविनाश देशमुख, शंकर चोंदे, अमोल चव्हाण, संदीप कदम, श्याम शिंदे, प्रकाश मरगज, कालीदास देशमुख, प्रशांत पालांडे, निलेश कदम विश्वनाथ पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवभक्त सुजित मंडलिक यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त  बदलापूर  पश्चिम मध्ये नागरीकांना सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत मोफत रिक्षा प्रवास सुविधा देऊन नागरीकांना एक अनोखी भेट दिली. 
आज  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बदलापूरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी शिवभक्त सुजित मंडलिक यांनी आज आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली. बदलापूर पश्चिम मधील बहुतांश नागरीक रिक्षा ने प्रवास करतात, वडवली, बेलवली या भागात राहणारे नागरिकांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. बेलवली रिक्षा स्टँडवर आपल्या  रिक्षांवर भगवा ध्वज आणि  विनामुल्य रिक्षा सेवेचा स्टिकर लावण्यात आले होते. कोरोना संसर्ग काळात सुरक्षित अंतर,  मास्क वापर,आणि स्वयंम शिस्त पाळूया- गर्दी टाळूया असा संदेश देत जयंती साजरी केली. वांगणी येथेदखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत किनारा रेसिडेंशियल स्कूल नीड ऑफ स्पेशल केअर या शाळेतील विद्यार्थ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती साजरी केली असे माहिती युवराज गीध यांनी दिली.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...