आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या जयंतीला किल्ले रायगडावर महाराजांना अभिवादन केले जाते. शासकिय नोंदीनुसार 19 फेब्रुवारी 1630 ही महाराजांची जन्म तारीख निश्चित करण्यात त्यानुसार आजच्या दिवशी शासकीय इतमामात महाराजांची जयंती साजरी केली जाते.
शिवजयंती प्रथम कोणी व केव्हा साजरी केली?
इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.
२०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.
शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.