मतदार यादीमधील गोंधळाबाबत काँग्रेस आक्रमक

 

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या यादीमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ घालण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केला आहे तसेच या याद्या संदर्भात आलेल्या हरकतींवर योग्य कार्यवाही न केल्यास या मतदार यादी  विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा प्रदीप पाटील यांनी यावेेळी दििला.

अंबरनाथ नगर पालिकेच्या निवडणुका  करिता याद्या प्रसिद्ध झाल्या असून या मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नगरपालिकेच्या प्रभाग निहाय मतदार यादी बनवताना विधानसभेची यादी फोडून त्या या यादीमधील मतदारांचा समावेश प्रभाग निहाय यादी मध्ये करण्यात येत आहे. हे करीत असताना कोणत्याही प्रभागाची नावे कोणत्याही प्रभागात जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. प्रभाग निहाय मतदार यादी तयार करताना इतर प्रभागातील नावे बेधडकपणे टाकण्यात येत असल्याने त्यावर आक्षेप घेण्यासाठी दिलेली मुदत अपुरी पडत आहे. बोगस मतदारांची नावे काढणे शक्य नसलं तरी ती नावे नेमकी कोणत्या प्रभागात टाकावी याबाबत अधिकार्‍यांमध्ये संभ्रम आहे. 

मतदार यादया मधील गोंधळ हा अधिकाऱ्याच्या चुकीमुळे झाला असून अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदार यादी साठी नेमलेला BLO हा  प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम न करीत असल्याने सर्वाधिक गोंधळ झाल्याचा आरोप प्रदीप पाटील यांनी केला आहे याद्यांमध्ये गोंधळ असल्याने हरकती घेण्यासाठी देखील विलंब होत आहेत त्यातच घेतलेल्या हरकतींवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध न झाल्याने संबंधित या  त्रुटी कायम राहतील आणि त्याच आधारावर निवडणुका घेतल्या जातील असा आरोपही पाटील यांनी केला आहे अंबरनाथ शहरातील अस्तित्वातील मतदार यादीत 30 ते 35 हजार बोगस मतदारांचा समावेश असून त्याबाबत देखील योग्य ती कार्यवाही होण्याची गरज आहे मतदार याद्यांमध्ये ज्या हरकती येतील ्या हरकत  साठी कागदपत्र मागणे हे योग्य नसून कर्मचार्‍यांनी जागेवर जाऊन त्याची पाहणी करावी आणि त्यानंतरच त्या मतदाराचे नाव योग्य त्या मतदारयादीत समाविष्ट करावा असे आवाहन प्रदीप पाटील यांनी केले आहे मतदार यादी मधील गोंधळ कमी न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...