बदलापूरकरांनो पहा शहराची कोरोना रुग्ण स्थिती; एकाच महिन्यात वाढले २४४७ रुग्ण

बदलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मार्च महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल २४४७ ने वाढ झाली आहे. तर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

कुळगाव बदलापूर नगर पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बदलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १२३९० (३१ मार्च पर्यंत) इतकी असून ११,७३१ रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन ते घरी गेले आहेत. उपचार होऊन बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९४.६८ इतकी झालेली आहे तर मार्च महिन्याच्या सुरुवातीस रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९६% इतके होते म्हणजेच केवळ १७८ (१.७५% ) रुग्णांवर उपचार सुरू होते. 

बदलापूर शहरात जानेवारी महिन्यामध्ये ४९३,  फेब्रुवारी महिन्यामध्ये ५६० इतके रुग्ण आढळले होते तर त्या तुलनेत मार्च ह्या एकाच महिन्यात २४०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.  

एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना चाचणी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. जानेवारीत २५४१ तर १९६४ चाचण्या फेब्रुवारीत घेण्यात आल्या तर  मार्च  महिन्यात १ मार्च ते  ३१ मार्चपर्यंत ४४७९ चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत.

बदलापूर शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रशासन सतर्क झाले असून प्रशासनामार्फत नागरिकांना कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात उद्घोषणेद्वारे गर्दीच्या ठिकाणी न जाणे, मास्क चा नेहमीत वापर करणे, बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणे,  आंघोळ करणे,  कोरोना झाल्यास घाबरून न जाता नगरपालिका प्रशासनाने तात्काळ त्याची माहिती देऊन त्यावर उपचार घेणे यासोबतच बदलापूर पश्चिमेच्या गौरी सभागृहात कुळगाव बदलापूर नगरपालिकेने अति दक्षता विभाग पुन्हा सुरु केले आहे. तसेच कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढविण्यात आला आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...