रस्ता अपघातात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू


 अंबरनाथ:  ट्रक आणि मोटरसायकलच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत भागवत (५५) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
         गुरुवारी (ता.१)  संध्याकाळी ५.१५ वा.च्या सुमारास आनंदनगर एमआयडीसी रोड, पेट्रोल पंपजवळ हा अपघात झाला. बदलापूरला राहणारे चंद्रकांत भागवत बदलापूरहुन अंबरनाथच्या दिशेने येत असताना वैभव हॉटेल चौकात एका भरधाव ट्रकने भागवत यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने  ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडक देत थेट भागवत यांच्या दुचाकीवर येऊन आदळला. या ट्रकने आणखी  एका  चार चाकी गाडीलाही धडक दिली.  या अपघातात भागवत यांचा जागीच मृत्यू झाला तर चारचाकी गाडीमधील चालकाला किरकोळ दुखापत झाली. चंद्रकांत भागवत हे शिवाजीनगर  पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे प्रमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.चंद्रकांत भागवत बदलापूरचे रहिवासी असून त्यांच्या या दुर्दैवी मृत्युबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...