'कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांवर फीवाढीचा बोजा पडू नये, यासाठी 2020-21 शैक्षणिक वर्षात फीवाढ न करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व शिक्षण संस्थांना दिले आहेत. तसेच आता या आदेशानुसार महाराष्ट्रात यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाची फीवाढ शिक्षण संस्थांना करता येणार नाही.
याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाची एकूण फी एकरकमी न मागण्याचेही निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. तसेच शालेय फी भरण्याकरिता पालकांना ऑनलाईन चा पर्याय उपलब्ध करून द्या असेही आदेशात नमूद केले आहे.