आज ९ मे रोजी बदलापुरात करोनाचे पुन्हा तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण ३० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आता बदलापुरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ५१ झाली आहे. आतापर्यंत बरे होऊन डिस्चार्ज झालेल्या व्यक्तींची संख्या २० आहे. नगरपालिकेने आतापर्यंत दहा कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत.
आजची कोरोना बाधितांची संख्या-03
Covid19 सद्यस्थिती (09-05-2020)
वेळ - 5:30वाजता
कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये
आजची कोरोना बाधितांची संख्या-03
1) स्त्री,वय 64, मोतिभाई टॉवर,
बाजारपेठ , बदलापूर,
मीरा हॉस्पिटल कल्याण येथे
ऍडमिट होते, आता ठाणे सिविल
येथे ऍडमिट करण्यात येत आहे.
2) स्त्री, वय 32, शुश्रुत पार्क, बदलापूर पश्चिम
नायर हॉस्पिटल मुंबई येथील परिचारिका (नर्स)
3) पुरुष, वय 55, चैतन्य संकुल
कात्रप, बदलापूर पूर्व,सफाई कामगार,
सायन वैद्यकीय कॉलेज, मुंबई.
पुढील उपचारासाठी पाठविन्यात
येत आहे.
घरी रहा, सुरक्षित रहा
प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करा !!!
करोनापासून स्वतःला वाचवा.आणि महत्वाचं आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करून घ्या.