कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी पदी दीपक पुजारी यांची नियुक्ती
बदलापूर:- बुलढाणा जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पुजारी यांची कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी पदी निवृत्ती करण्यात आली असून त्यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिले आहेत.
कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी च्या कामकाजाचे गांभीर्य, निकड विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नगर विकास विभागाने चार मे रोजी सदस्या देश जारी केले आहेत.
दीपक पुजारी यांची प्रशासकीय कारणास्तव प्रकाश बोरसे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर बदली करण्यात आलेली आहे. दीपक पुजारी यांनी यापूर्वी मीरा-भाईंदर महापालिकेत उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.